शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडी तालुक्यातील बॉक्साईटची रॉयल्टी मुरतेय कुठं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:42 IST

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॉक्साईटच्या खाणी आहेत.

ठळक मुद्देगावांतील रस्त्याची दयनीय अवस्था असून, रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था यातून केंद्र शासनाला कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी जमा होते परदेशात मोठ्या प्रमाणात जहाजातून बॉक्साईट निर्यात केले जाते.

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॉक्साईटच्या खाणी आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत जमा होते. यातील एक रुपयाही तालुक्याच्या विकासकामांवर खर्च न होता तो निधी अन्य राज्यांत नेला जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे विकासापासून वंचित शाहूवाडी तालुक्याचे मागासलेपण कधी दूर होणार, हा प्रश्न आ वासून उभा आहे.बॉक्साईटच्या खाणी आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत जमा

शाहूवाडी तालुक्यात बॉक्साईटचे उत्खनन १९८२ पासून सुरू झाले. प्रथम उदागेरी येथे उत्खननास प्रारंभ झाला. बॉक्साईट उत्खनन करण्यासाठी केंद्र शासनाने खाणमालकांना अनेक अटी घातल्या आहेत. या सर्व अटींचे पालन करून उत्खनन करावयाचे आहे. या उत्खननातून मिळणारी रॉयल्टी शाहूवाडी तालुक्याच्या विकासकामांसाठी खर्च करावयाची आहे. याउलट ही रॉयल्टी शाहूवाडी तालुक्यात खर्च न होता अन्य राज्यांत खर्च होत आहे. तालुक्यात उदागेरी, गिरगाव, धोपेश्वर, रिंगेवाडी, ऐनवाडी, धनगरवाडी, मानोली, आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे उत्खनन होते. येथून वर्षाला पन्नास लाख टन बॉक्साईट निर्यात होते. यातून केंद्र शासनाला कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी जमा होते. यातील बॉक्साईट बेळगाव, कोल्हापूर, कर्नाटक, जयसिंगपूर, गारगोटी, कºहाड, आदी ठिकाणी पाठविले जाते. परदेशात मोठ्या प्रमाणात जहाजातून बॉक्साईट निर्यात केले जाते. या बॉक्साईटपासून अ‍ॅल्युमिनिअम, सिमेंट, तुरटी, आदी उपपदार्थ तयार केले जातात. परदेशात निर्यात होणारे बॉक्साईट ‘ए’ ग्रेडचे असते. ‘ए’ ग्रेड बॉक्साईटपासून सोन्याचा धातू, प्लेटिनियम धातू तयार केले जातात.

बॉक्साईटच्या खाणीमुळे शाहूवाडी तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आहे. मात्र, याचा फायदा स्थानिक जनतेला झालेला नाही. बॉक्साईट उद्योगावर दररोज सहाशे ट्रक या मालाची ने-आण करतात. स्थानिक शाहूवाडी तालुक्यातील १५० ट्रक, तर ४५० ट्रकपरप्रांतीय मालकांचे आहेत. या उद्योगात तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे, गोवा, गुजरात येथे जावे लागते. या उद्योगात मूठभर स्थानिक नागरिकांचा फायदा झालेला आहे. तालुक्याला खनिज संपत्ती, वनसंपत्तीची देणगी लाभलेली आहे. येथील जंगलात किमती व औषधी वनस्पती आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे वाघांची व अन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

ज्या गावात बॉक्साईटचे उत्खनन केले जाते, त्या गावातदेखील रॉयल्टी खर्च होत नाही. येथील नागरिकांना खाणमालक मूलभूत सुविधादेखील देत नाहीत. खाणमालकांनी ज्या गावाच्या परिसरात उत्खनन करावयाचे असते, त्या गावांत लाईट, रस्ता, गटारी, शैक्षणिक सुविधा व आरोग्याच्या सुविधा पुरवायच्या असतात, असा शासनाचा नियम सांगतो. उत्खननाअगोदर तालुक्यातील जनतेसमोर जनसुनावणी घेतली जाते. त्यावेळी खाणमालक सर्व सुविधा देण्याचा डांगोरा पिटतात. मात्र, उत्खनन सुरू झाल्यास या सर्व गोष्टींकडे खाणमालक कानाडोळा करतात. पस्तीस वर्ष तालुक्यात बॉक्साईटचे उत्खनन होत आहे. तरी तालुक्यातील एका गावाचादेखील विकास झालेला नाही. उदगिरी, गिरगाव, मानोली, ऐनवाडी, धनगरवाडी या गावांतील रस्त्याची दयनीय अवस्था असून, रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था आहे.तालुक्याचा विकास नाहीशासनाकडे बॉक्साईटच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातील पाच ते सहा कोटी रुपयांची रॉयल्टी जमा होते. ही रॉयल्टीची रक्कम शासनाकडून आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. मायनिंग उद्योग बहरूनदेखील तालुक्याचा विकास नाही, तर खाणकामगारांनादेखील मूलभूत सुविधा खाणमालक देत नाहीत! येथील रॉयल्टी परराज्यात खर्च होत असल्याने येथील जनतेवर अन्याय होत आहे.